भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां योगयाग। सिद्धी न पवेचि सांग

karitan yogayag| siddhi na pavechi sang

रचनाकार: संत सेना · अभंग
करितां योगयाग। सिद्धी न पवेचि सांग ॥१॥ देव एक भावाविण । नाहीं व्यर्थ शीण ॥२॥ केल्या तपाचिया राशी । तरि न मिळेची त्यासी ॥३॥ करितां धूम्रपान। न भेटे नारायण ॥४॥ सेना म्हणे नको कांहीं। एका वीण दुजे नहीं ॥५॥