भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां तयां काम धाम । तमाळश्याम ध्यानीं मनीं

karitan tayan kam dham | tamalashyam dhyanin manin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करितां तयां काम धाम । तमाळश्याम ध्यानीं मनीं ॥१॥ तेणें पावल्या आनंदा । वेधीं गोविंदा वेधलिया ॥२॥ जागृति स्वप्न सुषुप्ती आंत । नेणेति माता आणिकांची ॥३॥ निळा म्हणे अहोरात्रीं । देखती नेत्रीं तेंचि रुप ॥४॥