भजनी मालिका
← भजनांकडे परत

करितां परोपकार। त्याच्या पुण्या नाहीं पार

karitan paropakar| tyachya punya nahin par

रचनाकार: संत सेना · अभंग
करितां परोपकार। त्याच्या पुण्या नाहीं पार ॥१॥ करितां परपीडा । त्याच्या पापा नाही जोडा ॥२॥ आपुलें परावें समान । दुजा चरफडे देखून ॥३॥ आवडे जगा जें कांहीं। तैसें पाहीं करावें ॥४॥ उघडा घात आणि हित । सेना म्हणे आहे निश्चित ॥५॥