भजनी मालिका
← भजनांकडे परत

करिता नित्य नेम । रायें बोलाविले जाण

karita nitya nem | rayen bolavile jan

रचनाकार: संत सेना · अभंग
करिता नित्य नेम । रायें बोलाविले जाण ॥१॥ पांडुरंगें कृपा केली । राया उपरती झाली॥२॥ मुख पाहतां दर्पणीं। आंत दिसे चक्रपाणी ॥३॥ कैसी नवलपरी । वाटीमाजी दिसे हरी रखुमादेवीवर । सेना म्हणे मी पामर ॥४॥