भजनी मालिका
← भजनांकडे परत

करीन कैवाड हाचि अनुदिनीं । तुमच्या चिंतनीं पांडुरंगा

karin kaivad hachi anudinin | tumachya chintanin panduranga

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करीन कैवाड हाचि अनुदिनीं । तुमच्या चिंतनीं पांडुरंगा ॥१॥ नेदीं जाऊं वांयां घटिका एकी पळ । करुं सर्वकाळ हेचि चर्चा ॥२॥ संतसमागमें गाऊं नित्य नामें । आपुलिया प्रेमें आवडिच्या ॥३॥ आठवूं सुंदरु रुप मनोहर । कटावरी कर ठेविले ते ॥४॥ निळा म्हणे माझी मनींची आवडी । दाविली उघडी करुनियां ॥५॥