भजनी मालिका
← भजनांकडे परत

करी हरिकथा टाकी दंभमान । वायंचि पतन पडूं नको

kari harikatha taki dambhaman | vayanchi patan padun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करी हरिकथा टाकी दंभमान । वायंचि पतन पडूं नको ॥१॥ नामाचा विश्वास संतांचा सांगात । तेणें तुझें हित सर्व होय ॥२॥ द्रव्य दारा यांचा मानी पा विटाळ । सर्वां ठायीं निर्मळ होसी बापा ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा धरी मार्ग । सोपा संसर्ग पूर्वजांसी ॥४॥