भजनी मालिका
← भजनांकडे परत

कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची

kanyecha kari jo nar vikara | chandal to khara adhamachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कन्येचा करी जो नर विकरा । चांडाळ तो खरा अधमची ॥१॥ तयाचिया मुखा श्वानाची ते विष्ठा । पातकी वरिष्ठा सर्वाहुनीं ॥२॥ पंचमहापातकी विश्वासघातकी । यापरता दोष का तया अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं त्याचें नाम घेतां । सचैल सर्वथा स्नान कीजे ॥४॥