भजनी मालिका
← भजनांकडे परत

कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काहीं न चले

kanyaputradik marati upavasi | upav tayasi kahin na chale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कन्यापुत्रादिक मरती उपवासी । उपाव तयासी काहीं न चले ॥१॥ आणूनियां तृण बीज तें भक्षिती । निर्वाह या रीति चालविती ॥२॥ वस्तीसी त्या ठाव न देती कोण्ही । दुर्बळ म्हणोनि उपहासीती ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें भोगी दु:ख । तयासी तें सुख स्वप्नीं नाहीं ॥४॥