भजनी मालिका
← भजनांकडे परत

कन्यादान केल्या पाहें । तो आपले घरों घेउनी जाये

kanyadan kelya pahen | to apale gharon gheuni jaye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कन्यादान केल्या पाहें । तो आपले घरों घेउनी जाये ॥१॥ वायां कायशी तळमळ । तेथें कांहीं न चले बळ ॥२॥ आयुष्याचें अंतीं । पडसी काळाचीये हातीं ॥३॥ करी कांहीं पां विचार । कवणाचें घरदार ॥४॥ जनीं जनार्दन एकला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥