भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसराया पूजितें नित्य । परि तो असुरचि उन्मत । काय पुरवील मनींचा हेत । दासी किंकर मी त्याची

kansaraya pujiten nitya | pari to asurachi unmat | kay puravil manincha het | dasi kinkar mi tyachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कंसराया पूजितें नित्य । परि तो असुरचि उन्मत । काय पुरवील मनींचा हेत । दासी किंकर मी त्याची ॥१॥ परमात्मा हा सर्वेश्रवर । कृष्ण सुंदरा अतिसुंदर । चर्चनमिसें लावीन कर । अति मनोहर करीन पूजा ॥२॥ मग येऊनियां ते निकट जवळी । मस्तक ठेवी चरणकमळीं । म्हणे चर्चीन हा करतळीं । जरी तूं आज्ञा देशील ॥३॥ नित्य रायातें चर्चितां । चातुर्य आलें माझिया हातां । आतांही तेथेंहि जात जातां । तूंतें देखिले निज दृष्टी ॥४॥ मग तैसीची मी येथें आलें । तुझिया चरणातें पावलें । दासी विद्रूपचि परी मज ठेविलें । रायें याचि कार्यावरी ॥५॥ जणोनी तिचा अंतर्भावो । प्रसन्न झाले देवाधिदेवो । म्हणती तरी तूं अवश्यमेवो । चचीं चंदन निज हस्तें ॥६॥ निळा म्हणे आली पूजा । नाहींचि त्यागणे गरुडध्वजा । जैसिया तैसे मग हा वोजा । करी देणें यथोचित्त ॥७॥