भजनी मालिका
← भजनांकडे परत

कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका

kanakaphal bhakshitan sahaj bhranti yeti | taishi hi phajiti sansarika

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कनकफळ भक्षितां सहज भ्रांति येती । तैशी ही फजिती संसारिका ॥१॥ मर्कटाचीये परे नाचे घरोघरीं । नाचवोनि भरी पोट तैसें ॥२॥ करिती तितुकें अवघें तें सोंग । नाहीं कांहीं रंग भाव भक्ति ॥३॥ एका जनार्दनीं पडिलासे भ्रांती । नेणें कधीं स्तुति देवाची तो ॥४॥