भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं

kam krodh nahin angin | tochi nar janmala jagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काम क्रोध नाहीं अंगीं । तोचि नर जन्मला जगीं ॥१॥ तयाचें होतां दरुशन । तुटे देहाचें बधन ॥२॥ अरुणोदयीं जाण । तम निरसे सहज आपण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । नोहे एकपणावांचून ॥४॥