भजनी मालिका
← भजनांकडे परत

काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप

kam krodh lobh nahin santan angi | vartatati jagin jagarup

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काम क्रोध लोभ नाहीं संतां अंगी । वर्तताती जगीं जगरुप ॥१॥ नातळोनी संसारा दाविती पसारा । भाव एक खरा विठ्ठलपायीं ॥२॥ आणिकांची स्तुति नायकती कानीं । न बोलती वचनीं वायां बोला ॥३॥ एका जनार्दनीं तेचि संत तारू । भवाचा सागरु उतरिती ॥४॥