भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलीमाजीं नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें

kalimajin nohe anushthan | kalimajin nohe havan | kalimajin nohe pathan | nohe sadhan mantrachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलीमाजीं नोहे अनुष्ठान । कालीमाजीं नोहे हवन । कालीमाजीं नोहे पठण । नोहे साधन मंत्राचें ॥१॥ नोहे योगयागाविधी । नसती अंगीं ते उपाधी । वाढतसे भेदबुद्धी । नोहे सिद्धि कोणती ॥२॥ न चले कर्माचें आचरण । विधिनिषेधांचे महिमान । लोपली तीर्थे जाण । देवप्रतिमा पाषाण ॥३॥ न ठाके कोणाचा कोठें भाव । अवघा लटिका वेवसाव । एका जनार्दनीं भेव । जेथें तेथें वसतसे ॥४॥