भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळेल तैसें गाईन तुज । नाहीं जनासवें काज

kalel taisen gain tuj | nahin janasaven kaj

रचनाकार: संत सेना · अभंग
कळेल तैसें गाईन तुज । नाहीं जनासवें काज ॥१॥ स्तुती करीन आवडी। जैसी जीवा वाटे गोडी ॥२॥ नाम गाईन आनंदें। नाचेन आपुलाले छंदें ॥३॥ सेना म्हणे नाहीं। जनासवें काज कांहीं ॥४॥