भजनी मालिका
← भजनांकडे परत

कळासूत्रीं तुम्ही नाटका नटक । देव ब्रम्हादिक आज्ञाधार

kalasutrin tumhi nataka natak | dev bramhadik adnyadhar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कळासूत्रीं तुम्ही नाटका नटक । देव ब्रम्हादिक आज्ञाधार ॥१॥ न सांगतां कळे सर्व अंतरींचें । सकळही जीवाचें मनोगत ॥२॥ माझेविशीं कां हा मांडिला आळस । भेटीचा वोरस वांयां धाडा ॥३॥ जिवित्वाची ऐशी मांडिली फरारी । झालें भूमीवरीं भार वृथा ॥४॥ श्रलाघ्यची न वाटे जिणें झालें ओस । धरिलें उदास तुम्ही देवा ॥५॥ निळा म्हणे धीर नुपजेची आतां । तुम्हीं तो अनंता मोकलिलें ॥६॥