भजनी मालिका
← भजनांकडे परत

कलंकी अवतार पुढें होईल श्रीहरी । लोपोनी जातां धर्म मग अवतार धरी

kalanki avatar pudhen hoil shrihari | loponi jatan dharma mag avatar dhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कलंकी अवतार पुढें होईल श्रीहरी । लोपोनी जातां धर्म मग अवतार धरी ॥१॥ दहा अवतार भक्ताकारणें घेतो । भक्ताची आवडी म्हणोनी गर्भवासा येतो ॥२॥ अंबऋषी कैवारें दहा अवतार घेतले । एका जनार्दनी त्याचें चरित्र वर्णिलें ॥३॥