भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां

kain maninchi ichchha purel hi dhanv | pahin pandharirav jauniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कैं मनींची इच्छा पुरेल ही धांव । पाहीन पंढरीराव जाऊनियां ॥१॥ आलीया जन्माचें होईल सार्थक । निवारेल दुःख भव पीडा ॥२॥ कैं हें मस्तक ठेवीन चरणीं । पाहीन डोळे भरुनी श्रीमुख तें ॥३॥ एका जनार्दनीं कैं होईन पात्र । नासेल समस्त तापत्रय ॥४॥