भजनी मालिका
← भजनांकडे परत

कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ

kadhi bhetel raghupati | majala sanga maruti ||dhru

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कधी भेटेल रघुपती । मजला सांगा मारुती ॥धृ॥ मी अपराधी शब्द शरानें । दुःखित उर्मीलापती । कीं मजला सांगा बा० ॥१॥ साधु छळले माझें मज कळलें । वनीं राक्षस संगती । कीं मजला० ॥२॥ एका जनार्दनीं आश्रय तुझा । सज्जन जन जाणती । कीं मजला० ॥३॥