भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यासी दहा शिरें माथां । वीस हातीं येतां । नेदुनी सर्वथा । जीवें मारी

jyasi daha shiren mathan | vis hatin yetan | neduni sarvatha | jiven mari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्यासी दहा शिरें माथां । वीस हातीं येतां । नेदुनी सर्वथा । जीवें मारी ॥१॥ गांठी घ्यावया नाहीं । आतां करील काई । म्हणोनि राखी गाई । गवळीयांच्या ॥२॥ तेथेंही न संडी परी । दहीं दूध चोरी । भोगिल्या परनारी । मूळ माईके ॥३॥ बुध्दी बोध ठेला । एका जनार्दनीं अबोला । कांही न बोल बोला । ठेवणें गट्ट करुनी ठेला ॥४॥