भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यांचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी जन्मांची

jyanchen denen na sare kadhin | nahin upadhi janmanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्यांचें देणें न सरे कधीं । नाहीं उपाधी जन्मांची ॥१॥ काया वाचा आणि मनें । धरितां चरण लाभ बहु ॥२॥ चौर्‍यांशीचें नाहीं कोडें । निवारें सांकडें पैं जाण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । संतपूजनें लाभ बहु ॥४॥