भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले

jyachen nam smaratan kalikal thengana | taya narayana visarale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्याचें नाम स्मरतां कलिकाळ ठेंगणा । तया नारायणा विसरले ॥१॥ करिती पूजन आणि कांची स्तुती । दैन्यवाणे होती अंतकाळीं ॥२॥ एका जनार्दनीं तयाचें बंधन । कोण करील खंडन जन्म कर्मा ॥३॥