भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें करुनियां चिंतन । संत चरणी होती लीन

jyachen karuniyan chintan | sant charani hoti lin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्याचें करुनियां चिंतन । संत चरणी होती लीन ॥१॥ तो हा चंद्रभागे तीरीं । ठेउनी हात कटांवरी ॥२॥ उभा राहिला तिष्ठत । वाट भक्तांची पहात ॥३॥ निळा म्हणे मुनिजनां । ज्याची नित्य उपासना ॥४॥