भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचें देव त्या सांगातें मला नवल वाटतें

jyachen dev tya sangaten mala naval vataten

रचनाकार: संत गोणाई · अभंग
ज्याचें देव त्या सांगातें मला नवल वाटतें।॥१॥ एक बैसतो अश्वावरी एक चालती चरणचाली ॥२॥ एक जेविती मिष्टात्र एका न मिळे कोरान्न||३|| गोणाई म्हणे धन्य देवा । नामयाचा संचित ठेवा ||४||