भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती । स्वानुभव बोलती आपुलाल्या

jyache jaise bhav taisha tya daviti | svanubhav bolati apulalya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ज्याचे जैसे भाव तैशा त्या दाविती । स्वानुभव बोलती आपुलाल्या ॥१॥ परी तो एकला सकलांसीही पुरला । ज्याच्या परी झाला तैसा तेथें ॥२॥ एकचि स्वातीजळ विषे मुक्ताफळ । पालटें स्थळास्थळ होय तैसें ॥३॥ निळा म्हणे गंध उपाधी निराळा । दावीं पुष्पीं कळा उमलता ॥४॥