भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध

jyache gele kamakrodh | tochi sadhu jagin siddha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्याचे गेले कामक्रोध । तोचि साधु जगीं सिद्ध ॥१॥ लोभ मोह नाहीं ज्याशी । तोचि साधु निश्चयेंसी ॥२॥ गेले मद आणि मत्सर । साधु तोचि निर्विकार ॥३॥ एका जनार्दन साधु । त्याचे चरण नित्य वंदूं ॥४॥