भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख पाहे हृदयांत

jya sukhasi nahin ant | ten sukh pahe hrudayant

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ज्या सुखासी नाहीं अंत । तें सुख पाहे हृदयांत ॥१॥ सुख सुखाची मिळणी करुनी । घेईक आपुले मनीं ॥२॥ सुखें सुखानुभाव । हाचि ब्रह्माविद्येचा भाव ॥३॥ सुखें सुखाची मांडणी । शरण एका जनार्दनीं ॥४॥