भजनी मालिका
← भजनांकडे परत

जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक

jon jon dharasi vasana | ton ton nohe re ugana | pandharicha rana | dhyanamajin anik

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जों जों धरसी वासना । तों तों नोहे रे उगाणा । पंढरीचा राणा । ध्यानामाजीं आणिक ॥१॥ हेंचि सर्व साधनांचें सार । नको व्युप्तत्तीचा भार । या वचनीं निर्धार । धरी संतपायीं ॥२॥ नको योगयाग तप । वाउगा मंत्र खटाटोप । येणें न धाये माप । जन्मजरा मृत्युचे ॥३॥ नको पडूं याचे भरी । वाचे म्हणे कृष्ण हरी । एका जनार्दनीं निर्धारी । निष्पाप होसी तूं ॥४॥