भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां पाणी । वंदा तुळशी निशिदिनीं

jodoniyan pani | vanda tulashi nishidinin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जोडोनियां पाणी । वंदा तुळशी निशिदिनीं ॥१॥ द्वारी घालुनी वृंदावन । वरी तुळशी बीजारोपण ॥२॥ तया घालितां हो पाणी । पाप नुरेची मेदिनीं ॥३॥ तुळशीची सेवा । एका जनार्दनीं देवा ॥४॥