भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनिया हात दोन्हीं । पुंडलीक मुनी विनवीत

jodoniya hat donhin | pundalik muni vinavit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जोडोनिया हात दोन्हीं । पुंडलीक मुनी विनवीत ॥१॥ आम्हा तैसें उगेचि रहा । माझिये पहा प्रेमासी ॥२॥ जे जे येती ज्या ज्या भावें । ते ते तारावें कृपाळुवा ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ब्राह्मा पसरुनि हरी बोलें ॥४॥