भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो कां भगवंताचा दास

jo kan bhagavantacha das

रचनाकार: संत रामदास · अभंग
जो कां भगवंताचा दास । त्याने असावें उदास सदा श्रवण मनन। आणि इंद्रियदमन नानापरी बोधुनि जीवा। आपुला परमार्थ करावा आशा कोणाची न करावी। बुध्दि भगवंतीं लावावी रामदासीं पूर्णकाम। बुध्दि दिली हे श्रीरामे।