भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो जो काळ कीर्तनीं जाय । तो तो हाय सार्थक

jo jo kal kirtanin jay | to to hay sarthak

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जो जो काळ कीर्तनीं जाय । तो तो हाय सार्थक ॥१॥ घटिका पळही न वचे वांयां । चुकवी आपायापासुनी ॥२॥ न लगे जन्मांतरा येणें । पुढती मरणें मागुती ॥३॥ निळा म्हणे ऐसा निका । उपाय नेटका सकळांसी ॥४॥