भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो देवांचें पद सोडी । सदा गोडी अंतरीं

jo devanchen pad sodi | sada godi antarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जो देवांचें पद सोडी । सदा गोडी अंतरीं ॥१॥ पापें पळती रामनामें । खंडताती कर्माकर्में ॥२॥ नामें कळिकाळासी धाक । यमदुतां न मिळे भीक ॥३॥ ऐसा नामाचा महिमा । नाहीं आणिक उपमा ॥४॥ आवडी जो नाम गाय । एका जनार्दनीं वंदी पाय ॥५॥