भजनी मालिका
← भजनांकडे परत

जो देखे एकदां तरी । हें पंढरी-वैकुंठ

jo dekhe ekadan tari | hen pandhari-vaikunth

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जो देखे एकदां तरी । हें पंढरी-वैकुंठ ॥१॥ सुती तया आली हाता । नाहीं चिंता मोक्षाची ॥२॥ याचिये मार्गी पाऊल पडे । तेव्हांचि जोडे यात्रा त्या ॥३॥ निळा म्हणे प्रत्यक्ष भेटी । ते तो लुटी निजानंदा ॥४॥