भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई

jiviche jivalage majhe krushnai kanhai

जीवीचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई । सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही ।। १ ।। आला अपवाद याती संबंध लौकिक पाही । सावळे डोळसे करुणा येऊ दे काही || २ || दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती पाही । सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ॥३॥ शरण कान्होपात्रा तुजला वेळोवेळा पाही । सावळे डोळसे करुणा येऊ दे काही ।।४।।