भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव । पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें

jivachahi jiv majhaya shivacha shiv | pandharicha dev man budhdi indriyen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव । पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें ॥१॥ आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन । मी माझें हें जतन कोण करी यावरी ॥२॥ नयनाचेंही नयन माझया घ्राण । श्रवणाचेंहि श्रवण तोचि रसनेची रसना ॥३॥ त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा । बोलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥४॥ कराचेहि कर माझा चरणचे चरण । चैतन्याचें चैतन तोचि रसनेची रसना ॥५॥ त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा । बाकलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥६॥ कराचेहि कर माझया चरणाचे चरण्‍ । चैतन्याचें चैतन्य तोचि मनांचे मन ॥७॥ निळा म्हणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान । शांति क्षमा दया तोचि सिध्दी साधन ॥८॥