भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवभाव ठेवूं पायीं । तरी तो काय लटिकाचि

jivabhav thevun payin | tari to kay latikachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जीवभाव ठेवूं पायीं । तरी तो काय लटिकाचि ॥१॥ याचिलागीं लिगटलों । पायीं जडलों न ढळेसा ॥२॥ जेथें संतचरणरज । पडती सहज मी तेथें ॥३॥ निळा म्हणे याविण आतां । न दिसे अर्पितां उत्तीर्णपणा ॥४॥