भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा

jihin nimishamatren deh palatila | striyechachi kela purush ubha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिहीं निमिषमात्रें देह पालटिला । स्त्रियेचाचि केला पुरुष उभा ॥१॥ त्यांचे नवल कोण तारिती जड जीवा । यालागीं घडावा संतसंग ॥२॥ जिहीं फिरविलें औंढयाचें देऊळ । बोलविले बोल मूर्तिकरवीं ॥३॥ निळा म्हणे जिहीं प्रेतें जिवविलीं । वरदें उपजविलीं बाळें स्त्रिया ॥४॥