भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिहीं अवलोकिला डोळां । हरील्या त्यांच्या जीवनकळा

jihin avalokila dolan | harilya tyanchya jivanakala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिहीं अवलोकिला डोळां । हरील्या त्यांच्या जीवनकळा ॥१॥ ऐसा अनादि हा बुडवणा । आहे ठावा विचक्षणा ॥२॥ चित्तें वित्तें आपणा एैसे । करुनि ठेवी निजध्यासें ॥३॥ निळा म्हणे पडिल्या गांठीं । न सोडी नष्ट हा शेवटीं ॥४॥