भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी

jethen sarvada kirtanaghosh | jati dosh paluni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें सर्वदा कीर्तनघोष । जाती दोष पळुनी ॥१॥ यमधर्म संगे दूता । तुम्ही सर्वथा जाऊं नका ॥२॥ जेथे स्वयें हरि उभा । कोण शोभा तुमची ॥३॥ तुम्ही रहावें उभे पुढें । आलें कोडें निवारावें ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तन । श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥