भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण

jethen papapunyakarmacharan | vadhavitahe janmamaran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण ॥१॥ जया पुण्याचीया गोडी । स्वधर्म जोडिताती जोडी ॥२॥ जय नाहीं हा विश्वास । असोनि न दिसे जगीं भाष ॥३॥ एका जनार्दनीं डोळा । असोनि देही तो अंधळा ॥४॥