भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई

jethen jethen man jail vasana | phiravaven narayan hechi dei

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें जेथें मन जाईल वासना । फिरवावें नारायण हेचि देई ॥१॥ वारंवार द्यावा नामाचा आठव । कुबुद्धिचा ठाव पुसा सर्व ॥२॥ भेदाची भावना तोडावी कल्पना । छेदावी वासना समूळ कंद ॥३॥ एका जनार्दनीं नका दुजा छंद । रामकृष्ण गोविंद आठवावा ॥४॥