भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर

jethen harinamacha gajar | karma palatase dur

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जेथें हरिनामाचा गजर । कर्म पळतसे दूर ॥१॥ नाम निर्दाळीं पापातें । वदती शास्त्र ऐशीं मतें ॥२॥ पापाचे पर्वत । नाम निर्दाळी सत्य ॥३॥ नाम जप जनार्दन । एका जनार्दनीं पावन ॥४॥