भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें छत्र सिंव्हासन । दिधलें आसन त्रिणाचें त्या

jenen chhatra sinvhasan | didhalen asan trinachen tya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जेणें छत्र सिंव्हासन । दिधलें आसन त्रिणाचें त्या ॥१॥ काय उर्त्तीण होईजे रंकें । तेंचि म्यां मशकें संतचरणा ॥२॥ ज्याचिया कृपें ब्रम्हानंद । पावलों अगाध अक्षयी तो ॥३॥ निळा म्हणे साम्राज्यें लेणें । लेवविलें ईक्षणें कृपेचिया ॥४॥