भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे जे वेळें जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेगें

je je velen jen jen lage | ten na magatan puravi vegen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जे जे वेळें जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेगें ॥१॥ ऐसा भक्तांचा अंकित । राहे द्वारीं पैं तिष्ठत ॥२॥ आवडी गौळियांची मोठी । गायी राखी जगजेठी ॥३॥ भक्ति भावार्थें भुकेला । एका जनार्दनीं विकला ॥४॥