भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे जे तुम्हां शरण आले । ते ते नेले निजधामा

je je tumhan sharan ale | te te nele nijadhama

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जे जे तुम्हां शरण आले । ते ते नेले निजधामा ॥१॥ पुढें जे आणिक भजती नवे । त्यांच्या भावें त्यां देसी ॥२॥ ऐसे अपार युगायुगीं । करितां जगीं उपकार ॥३॥ निळा म्हणे माझी चिंता । असों दया अनंता विनवितों ॥४॥