भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयतां रामनामावळी । महदोषां होय होळी

jayatan ramanamavali | mahadoshan hoy holi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयतां रामनामावळी । महदोषां होय होळी ॥१॥ ऐसा महिमा नामाचा । किती वर्णावा पै वाचा ॥२॥ बैसोनि स्मशानीं । शंभु जपे ध्यानीं मनीं ॥३॥ गिरजेसी वारंवार । सांगे रामनाम शंकर ॥४॥ तें हें उत्तम रामनाम । एका जनार्दनी निजधाम ॥५॥