भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयां आहे मुक्तीचें कोडें । तें तें उघडें नांदत

jayan ahe muktichen koden | ten ten ughaden nandat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयां आहे मुक्तीचें कोडें । तें तें उघडें नांदत ॥१॥ वेगीं जाय पंढरपुरा । मुक्ति सैरा फुकटची ॥२॥ मोक्ष मुक्ति राबे द्वरी । वैष्णवा घरी कामारी ॥३॥ एका जनार्दनीं मुक्ति त्याग । वैष्णव पांग धरिती ॥४॥