भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयामुखीं नाममंत्र । तया जग हें पवित्र

jayamukhin namamantra | taya jag hen pavitra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयामुखीं नाममंत्र । तया जग हें पवित्र ॥१॥ नाम वंदें ज्याची वाचा । देव हृदयीं वसे साचा ॥२॥ नामीं प्रीति अखंड ज्यासी । मोक्ष तया करी वसे ॥३॥ एका जनार्दनीं नाम । हेंचि चैतन्य निजधाम ॥४॥