भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे

jayalagin kariti yogi sayas | to hari pandharis ubha ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयालागीं करिती योगी सायास । तो हरी पंढरीस उभा असे ॥१॥ न लगे साधन मांडणें तत्त्वता । नाम गातीं गातां सोपा सर्वां ॥२॥ नर अथवा नारी न म्हणे दुराचारी । दर्शनें उद्धरे जडजीवां ॥३॥ पुंडलिका भाक देऊनि सावकाश । पुरवितो सौरस अद्यापिवरी ॥४॥ एका जनार्दनीं चैतन्याचा गाभा । विटेवरी उभा भक्तासाठीं ॥५॥